आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी मिशनतर्फे महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मानासाठी यंदा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली आहे. १३ डिसेंबर रोजी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या सन्मानात ५० हजार रुपयांची राशी, सन्मानचिन्हाचा समावेश आहे. प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीत एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सेवानिवृत्त न्यायाधीश डी. आर. शेळके, प्रा. डॉ. क्षमा खोब्रागडे, कवी दासू वैद्य, डॉ. आशिष गाडेकर, लेखक प्रवीण बर्दापूरकर यांचा समावेश आहे.
मराठवाड्यातील दोन व्यक्तींचा सन्मान पुरस्कराचे हे दुसरे वर्षे आहे. सध्या हैदराबादच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी चालू आहे. त्यानुषंगाने ताराबाई लड्डा यांची निवड केली. तसेच साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. त्यामुळे या दोघांची निवड केली. डॉ. जयदेव डोळे, समिती सदस्य
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.