आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरी (उडीसा) येथे सुरु असलेल्या 44 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय पुरुष महिला सॉफ्टबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. पुरुष व महिलांच्या संघांनी आपापल्या गटातील साखळी सामने जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
पुरुषांच्या गटामध्ये झालेल्या आज दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने जम्मू कश्मीर या संघाला 7-0 होमरणांच्या फरकाने पराभूत केले. महाराष्ट्राचा उत्कृष्ट पिचर गौरव चौधरी याने भेदक पिचिंग केली आणि त्याचबरोबर एक उंच होमरन मारून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. गौरवसह आज झालेल्या सामन्यांमध्ये स्वप्नील गदादे, राज भिलारे, प्रतीक डुकरे यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, प्रसेनजित बनसोडे, चेतन महाडिक, गणेश बेटूदे व ऐश्वर्या भास्करण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्पर्धेत संतोष आवचार, जितेंद्र मेवाड, विकास वानखेडे, संजय अहलावत यांनी पंच म्हणून काम पहिले.
पश्चिम बंगालवर एकतर्फी विजय
महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने पश्चिम बंगाल संघावर 10-0 होमरणच्या फरकाने एकतर्फी विजय प्राप्त केला. आक्रमक महाराष्ट्र पुढे बंगालच्या खेळाडूंना एकही रन काढता आला नाही. महाराष्ट्राच्या मोनाली नातू, सई जोशी, स्वप्नाली वायदंडे यांनी जोरदार पिचिंग केली आणि ऐश्वर्या पुरी, ऐश्वर्या बोडखे त्यांना उत्कृष्ट खेळी करत साथ दिली. सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघास विजय प्राप्त करुन देण्यात या खेळाडूंनी महत्वाचे योगदान दिले. आज रात्री उशिरा महाराष्ट्राचे क्वार्टर फायनलचे सामने होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.