आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 40 बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक अधिकारी कर्मचारी आमचा परिवार- राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक

हिंगोली जिल्हयात मागील एक वर्षापासून चोविस तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून स्वतंत्र ४० बेडचे कोविड केअर सेंटर बुधवारपासून ता. २८ सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लक्षणे नसलेल्या पण कोविड पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्हयात सुमारे १००० पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. कोविडच्या काळात कायदा व सुव्यवस्था सांभाळत पोलिस अधिकारी व कर्मचारी चोविस तास सेवा देऊ लागले आहेत. पोलिस ठाण्यातील तपासाचे कामकाज सांभाळून अधिकारी व कर्मचारी संचारबंदीच्या बंदोबस्तावर आहेत. यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणीही पोलिस कर्मचाऱ्यांना जावे लागत आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग झाल्यास तसेच त्यांना कुठल्याही प्रकरचे गंभीर लक्षणे झाल्यास त्यांना उपचारासाठी जून्या पोलिस अधिक्षक कार्यालयातच कोविड केअर सेेंटर सुरु करण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ४० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरु केले. या ठिकाणी सहाय्यक जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.मंगेश टेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी आज या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान, या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी चोविस तास कर्तव्यावर राहणार आहेत. त्यामुळे कोविड पॉझिटीव्ह मात्र लक्षणे नसणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.

प्रत्येक अधिकारी कर्मचारी आमचा परिवार- राकेश कलासागर, पोलिस अधिक्षक

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी आमचा परिवार आहे. त्यामुळे आमच्या परिवारातील सदस्यांची काळजी घेणे आमचे कर्तव्य असून त्या उद्देशानेच हे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य अधिकारी व कर्मचारी काळजी घेतीलच. पण पोलिस अधिकारीही या ठिकाणी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करतील.

बातम्या आणखी आहेत...