आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या शिक्षकांना 17 दिवसांचे विलगीकरण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना "कोरोना चाचणी केल्या शिवाय शाळेत नो एन्ट्री’ असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयाकडे चाचणी करून घेण्यासाठी धाव घेत आहे. त्यामध्ये काही शिक्षकांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तर काही रुग्णालयात पुरेशा टेस्ट किट नसल्याने तपासणी विनाच त्यांना मागे फिरावे लागत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार येत्या सोमवार दि. २३ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरु होणार आहेत. पहिला टप्पा म्हणून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच सर्व अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत कोविड १९ ची आरटीपीसीआर करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तो रिपोर्ट शिक्षकांनी शाळेत येताना आणायचा आहे. ही चाचणी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. दोन दिवसांपासून काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे टेस्टसाठी गेले असता काही शिक्षकांच्या टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांना दहा दिवस रुग्णालयात तर सात दिवस घरी विलगीकरणात राहावे लागणार आहे. ज्या शिक्षकांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, त्यांना दहा दिवस हॉस्पिटलमध्ये निगराणीत ठेवण्यात येईल. त्यांच्या कुटुंबियांची देखील तपासणी होईल. त्यांच्यावर उपचार करुन बरे झाल्यावर त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यानंतर शाळेवर हजर राहाण्यासाठी पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही. जे नियम इतरांसाठी लागू आहेत. तेच शिक्षकांना देखील असतील.- डॉ. नीता पडळकर (आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा)

प्रमाणपत्र किती दिवस गृहित धरणार अनुत्तरित

दरम्यान कोरोना टेस्ट झालेल्या शिक्षकांनी त्यांचे प्रमाणपत्र शाळेत रुजू होण्यापूर्वी सादर केल्यावर ते प्रमाणपत्र किती दिवस ग्राह्य धरले जाईल. ही पुन्हा काही दिवसांनी तपासणी करावी लागेल याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता करण्यात आली नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

ग्रामीण भागातील शिक्षकांना मुख्यालही राहण्याणे बंधनकारक करा

दरम्यान ग्रामीण भागातील पालकांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतांना म्हटले आहे की, ५० ते ५५ टक्के शिक्षक हे ग्रामीण भागात शहरातून ये-जा करतात. खरं तर ग्रामीण भागातील शाळेत असणाऱ्या शिक्षकांनी मुख्यालयीच राहणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण तसे न करता अप-डाऊन करतात. मग अशा वेळी कारोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. कोरोना तपासणी नंतर रुजू झालेल्या शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे असे पालकांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...