आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:सातारा परिसरातील रस्त्यावर सेप्टिक टँक, घाणीमुळे रोगराईचा धोका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील छत्रपती नगर भागात पूजा पार्कलगत (अयप्पा मंदिर परिसर) रस्त्यावर बांधण्यात आलेल्या सेप्टिक टँकमुळे घाण पाणी व मैला रस्त्यावर वाहत असून यामुळे शेजारील दुकाने व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जाणाऱ्या-येणाऱ्यांना, शेजाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून रस्त्यावरील हा शौच खड्डा तत्काळ बुजवून पर्यायी व्यवस्था द्यावी व परिसरात होणारी घाण थांबवावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

जाधववाडीत ट्रेडर्सचे दुकान फोडून एक लाख रुपये रोख रक्कम चोरी जाधववाडीत ट्रेडर्सचे दुकान फोडून चाेरांनी एक लाख रोख रक्कम लंपास केली. शनिवारी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. विजय कैलास पवार (३५) यांचे जाधववाडीमध्ये यशवंत ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. पवार यांनी एक लाख रुपयांची रोख रक्कम दुकानातील लोखंडी कपाटात ठेवून रात्री दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, चोरांनी हा प्रकार केला. याप्रकरणी सिडको पोलिस अधिक तपास करत आहेत.

संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने जयंती कार्यक्रम औरंगाबाद| संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदाधिकारी आणि विद्यार्थी अध्यक्ष रामभाऊ पेरकर, उपाध्यक्ष प्रा.कृष्णा मालकर, कोषाध्यक्ष फकीर राव राऊत, सचिव शिवाजी गाडेकर, उपाध्यक्ष अनिता देवतकर आणि ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...