आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन:रेशन दुकानवर गर्दी; शिधा वाटप दुकानात धान्य वाटपात अडचणींमुळे नागरिकांना फटका

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांवर गर्दी दिसून येते आहे. ई-पॉस मशिनचे सर्वर डाऊन असल्याने कार्डधारकांचे थम घेण्यासाठी उशिर लागत आहे. मशिन चालू बंद होत असल्याने रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपवासा प्रश्न नाही सोडवल्यास सर्व रेशन दुकानदाराच्या वतीने या मशीन जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात येईल असा इशारा रेशन दुकानदार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डी एन पाटील यांनी दिला आहे.

पाटील यांनी सागितले की मशीन मुळे कार्डधारक उशीर लागत असल्याने रागावता आहेत . अन्न धान्य घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. कार्डधारक या तांत्रिक अडचणींमुळे रेशन दुकानदारांना वेठीस धरत असल्याने त्रास होत आहे. मागिल तीन महीन्यांपासून सर्वर डाऊनचा त्रास आहे. त्यामुळे लाभा र्थिना वेळेवर अन्नधान्य वितरण करण्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. हि समस्या प्रशासनाने लवकर सोडवली नाही तर महासंघ तीव्र आंदोलन करुन ई-पोज मशिन पुढील महीन्यात ऑफीसमध्ये जमा करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

रेशन दुकानावर वाढते गर्दी

ई पॉस मशीन मध्ये धान्य घेण्यासाठी ग्राहक अंगठा लावत असताना सर्व प्रॉब्लेम मुळे प्रत्येकाला 15 ते 20 मिनिटं तर कधी अर्धा तास देखील लागत आहे त्यामुळे दिवसभरात 20 ते 30 लोकांना धान्य दिले जात आहे त्याचा परिणाम रेशन दुकानावर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नागरिकांना वेळ लागत असल्यामुळे नागरिक देखील रेशन दुकानदारावर चिडचिड करत असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे

गेल्या महिन्यात अशाच पद्धतीने दिवाळीच्या काळात सर्वच दुकानावर ही समस्या उद्भवली होती रेशन दुकानदार संघटनांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांच्याकडे तक्रार देखील केली होती मात्र त्यानंतरही ही समस्या अजूनही सुटलेली नाही

बातम्या आणखी आहेत...