आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा सेतू पॅटर्न:ढासाळलेल्या गुणवत्तेला 'सेतू'चे टॉनिक, दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या शैक्षणिक वर्षात दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यानंतर तीस दिवसात अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी मागील वर्षी शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम राबवण्यात आला होता. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी केलेल्या अभ्यासात सेतू अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आल्यानंतर पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमाची पुनर्रचना

विद्यार्थ्यांच्या आधीच्या इयत्तेतील महत्त्वाच्या क्षमता पूर्ण होण्याच्या दृष्टीने सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी केंद्रित आणि कृतीयुक्त अशा दिवसनिहाय अभ्यासक्रमाच्या कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रादेशिक विद्याप्राधिकरणमधील अधिष्ठातांनी दिली.

असा होईल विद्यार्थ्यांना फायदा

अँड्रॉइड फोन इंटरनेटची अपुरी सुविधा यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाचा फायदा चांगला होणार आहे. दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी नव्याने सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस संपूर्ण एक महिना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?

मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम करण्यात आला आहे. कृतिपत्रिकानिहाय दिवसनिहाय सर्व विषय पत्रिका तयार करण्यात येत आहेत.