आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Seven Gates On Rajgad; Dedication Of Entrances In The Presence Of Thousands, Arrangement Of Flowers At The Entrance, Showering Of Flowers By Helicopter At The Entrance Of The Fort

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी:राजगडावर सात दरवाजांना नवी झळाळी; हजारोंच्या उपस्थितीत प्रवेशद्वारांचे लोकार्पण

वेरूळ/ राजगड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्य मंदिर राजगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दुर्ग दिनाच्या निमित्ताने किल्ल्यावरील सात प्रवेशद्वारांचा दुर्गार्पण सोहळा हजारो दुर्गसेवकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. गडावरील सात खचलेल्या ठिकाणी सागवानी दरवाजे बसवण्यात आले. या वेळी हेलिकॉप्टरद्वारे सर्व प्रवेशद्वारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. प्रतिष्ठानमध्ये आैरंगाबाद जिल्ह्याचा सक्रिय सहभाग आहे.

पुन्हा गतवैभव प्राप्त
छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणाऱ्या चोर मार्गावरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार व बालेकिल्ला प्रवेशद्वार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशेष कारागिरांकडून तयार करण्यात आलेली सात सागवानी प्रवेशद्वारे बसवली.

बातम्या आणखी आहेत...