आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे सात जण अटकेत; ठाण्यात नाेटीस देऊन साेडले

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू होऊन महिना उलटल्यानंतर अंतिम सामनाच्या आधी ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या सात जणांना पाेलिसांनी अटक केली. पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात नेत नोटीस देऊन त्यांना सोडून दिले. सिटी चौक पोलिसांसह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सट्ट्याच्या कारवाईत सहभाग असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजाबाजार परिसरातील क्रोम जेंट्स पार्लरमध्ये न्यूझीलंड- पाकिस्तान सेमी फायनल सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशावरून सिटी चौकचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. सहायक निरीक्षक एम.एम. सय्यद, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, कल्याण चाबुकस्वार हे कारवाईसाठी रवाना झाले. पार्लरमध्ये फ्रिज दुरुस्तीचे काम करणारा शोएब खान (२७, रा. नवाबपुरा), रितेश सदगुरे (३३, रा. राजाबाजार) हे ऑनलाइन सट्टा खेळत हाेते. त्यांच्या चौकशीत संतोष बसैये (४०, रा. भानुदासनगर), अभिषेक अग्रवाल (३०, रा. उल्कानगरी), शेख मंजूर (४४, रा. जुना मोंढा) हे सापडले. या सर्वांना नागपुरच्या सुरेश ऊर्फ संजूभाऊ रामनिवास जाजू व औरंगाबादचा पुरब जैस्वाल हे दोघे आयडी पुरवत असल्याचे समोर आले.

पाच हजारांमध्ये मिळतो आयडी अन् पासवर्ड
सट्टा आता ऑनलाइन झाला आहे. विविध आयपी अॅड्रेसवरून आयडी तयार करून वापरकर्त्याला एक आयडी व पासवर्ड पुरवला जातो. आरोपींच्या माहितीनुसर, त्यांना पाच हजारांमध्ये आयडी मिळाला हाेता. त्याद्वारे पुढे डावावर सट्टा लावला जातो. काही वेळेला स्वतंत्र अॅप वापरले जाते तर काही वेळा लिंकद्वारे (वेबसाइट) हा खेळला जातो.

बातम्या आणखी आहेत...