आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांचा चावा:गणेश कॉलनीत भटक्या कुत्र्यांचा सात जणांना चावा; घाटीत इंजेक्शनही मिळेना

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. पाकिजा हॉलसमोर सोमवारी एकाच दिवशी कुत्र्यांनी ७ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात धाव घेतली, परंतु अँटी रेबीज उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरुन रेबीज घ्यावे लागले.

गणेश कॉलनी परिसरातील पाकिजा फंक्शन हॉलमध्ये सोमवारी विवाह सोहळा सुरू होता. त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला करत जखमी केले. घटनेमध्ये जखमी झालेल्या ७ जणांमध्ये २५ ते ५० वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे.

असमर्थ ठरत असलेल्या मनपाला बीओटीवर द्या
कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मनपा कुत्रे आवरण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे बीओटी तत्त्वावर चालणारी मनपाच पूर्णपणे बीओटी तत्वावर द्यावी.
फसीउद्दीन सिद्दिकी, रहिवासी.

निर्बीजीकरण करण्याची मोहीम तीव्र करणार
गणेश कॉलनीत कारवाई केली. शहरभरात मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू आहेे. समस्या युद्धपातळीवर सोडवण्यात येईल.शाहेद शेख, पशुवैद्यकीय अधिकारी

लहान मुलांचे घराबाहेर निघणे कठीण
लहान मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवताना एखादी मोठी व्यक्ती पाठवावी लागते. मुलांवर कुत्रे धावून येतात. त्यामुळे मुले घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत. -वसीम खान, हल्ल्यातील जखमी

बातम्या आणखी आहेत...