आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल:माजी सैनिकाच्या जमिनीचा सातबारा एमआयडीसीच्या नावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी सैनिक किसन सांडू सुस्ते यांना १९९१ मध्ये इटावा (ता. गंगापूर) येथील गट नंबर १४ मध्ये एक एकर १० गुंठे जमीन देण्यात आली. त्यात ते शेती करत आहेत. मात्र, २०१७-१८ फेरफार क्र. ८३४ अन्वये त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नाव आले. त्यामुळे सोमवारी (३ ऑक्टोबर) लोकशाही दिनात त्यांनी तक्रार केली.

ते म्हणाले की, मला मोबदला मिळणे आवश्यक आहे. मी वेळोवेळी चौकशी व विनंती करूनही कार्यवाही झालेली नाही. या जमिनीवर मी यंदा तुरीची लागवड केली आहे. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले की, भूसंपादनाचा विषय माझ्याअंतर्गत येत असल्यामुळे या प्रकरणाची मी स्वत: चौकशी करतो. यासाठीची आवश्यक ती सर्व कागदपत्रे मागवली जाणार आहेत. या वेळी तहसीलदार आश्विनी डमरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...