आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा निकाल:अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या कामेश जगन मते याला भारतीय दंड विधान आणि बाल अत्याचार लैंगिक प्रतिबंध कायद्यातील विविध कलमांतर्गत दोषी धरून बुधवार 22 जून रोजी जन्मठेपेची शिक्षा व एकूण 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

पोस्को कायद्याचे विशेष न्यायाधिश ए. एस. खडसे यांनी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व तिची आई दोन्ही फितूर झालेले असताना वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली

काय आहे प्रकरण?

कामेश याच्याशी विवाह केलेल्या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी व एक मुलगा आहे. हे दोन्ही मुले अल्पवयीन असून दोघे आईसह सावत्र वडिलांकडे रहात होते. आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सावत्र वडिल कामेश हा घरात येऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असे. तुला व तुझ्या भावाला घरातून हाकलून देईन अशी धमकी देऊन कामेश आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करत असे. मात्र मुलीने या छळास कंटाळून तिने आपल्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर आईच्या मदतीने तिने दिलेल्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल

न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली असता सरकारी वकील अरविंद बागुल यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणी दरम्यान पीडित मुलगी आणि तिची आई हे फितूर झाले. अ‍ॅड. बागुल यांनी अन्य साक्षीदार तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून गुन्हा घडल्याचे सिध्द केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीतून लैंगिक अत्त्याचार असल्याचे सिध्द केले. आणि मुख्यध्यापिकेच्या साक्षीतून पीडिता अल्पवयीन असल्याचे सिध्द केले. वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा या आधारे विशेष न्यायाधिश ए. एस. खडसे यांनी कामेश याला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. या प्रकरणी त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. खताने, रामदास सुरे आणि कायंदे यांनी सहकार्य केले.