आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लातूर एमआयडीसी चौकात लावले होते शहीद भगतसिंग यांचे बोर्ड, नामफलक काढण्यास खंडपीठाची स्थगिती

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर औद्योगिक वसाहतीतील पाच नंबरच्या चौकात लावण्यात आलेला शहीद भगतसिंग नामफलक तूर्तास महापालिका लातूर यांनी हटवू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अनिव पानसरे यांनी दिले आहेत. लातूर मनपाच्या स्थायी समितीने २४ डिसेंबर २०२१ रोजी ठराव घेऊन शहीद भगतसिंग चौक असे नामकरण केले होते.

संबंधित चौकाचे नामकरण करण्यासाठी अकाल सेना सचिव संतोष खोटे यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर अकाल सेना संस्था अध्यक्ष गुलमितसिंग जुन्नी यांना २१ मार्च २०२२ रोजी शहीद भगतसिंग चौक या नावाने एलईडी बोर्ड लावण्यास मनपा आयुक्त लातूर यांनी परवानगी दिली होती. आयुक्तांच्या हस्ते २३ मार्च २२ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर १५ जून २०२२ रोजी मनपा आयुक्तांनी एका आदेशाद्वारे बोर्ड लावण्यास मनाई केली होती. त्याविरुद्ध अॅड. सुहास उरगुंडे व अॅड. विद्या उरगुंडे यांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. शासनाने रीतसर परवानगी दिल्यानंतर पुन्हा रद्द करण्यात आल्याचे सांगून शहीद भगतसिंग यांच्या नावाचा बोर्ड लावण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अॅड. उरगुंडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...