आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतःच्या खुर्चीचा आणि सत्तेचा वापर मागास आणि वंचितांच्या प्रगतीसाठी करणारा देशात एकमेव राजा होऊन गेला आहे. त्या राजाचे नाव राजर्षी शाहू महाराज. विधवा पुनर्विविवाह, सक्तीचे शालेय शिक्षण, आंतरजातीय विवाह आणि अस्पृश्यता निवारणाचे कायदा करणाऱ्या या राजाने 19 व्या शतकात मोठी क्रांती केली होती, असे मत संत कबीर शिक्षण संस्थेचे सविच अॅड. धनंजय बोरडे यांनी केले.
शालेय साहित्याचे मोफत वितरण
संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानतर्फे रविवार 26 जून रोजी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनपाचे माजी सभापती अॅड. इकबालसिंग गिल होते. मिलकॉर्नर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर हा सोहळा झाला. यावेळी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोरडे. सी. एस. इंगळे, उमेश चौधरी, अंबडचे माजी नगराध्यक्ष विजय घोडे, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरचरणसिंग गुलाटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
50 टक्के आरक्षण
अॅड. बोरडे म्हणाले, करवीर संस्थांनात मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण दिले. पाल्यांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपयांचा दंड ठोठावणारे, अस्पृश्यता निवारणासाठी गंगाराम कांबळेला हॉटेल सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या हॉटेलमध्ये सवर्णांनी जाऊन चहा घ्यावे, असे परिपत्रक काढले. एवढेच नव्हे तर स्वत: राजेशाहीचा सर्व लावाजामा घेऊन शाहू महाराज गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये गेले. विधवा व घटस्फोटीत महिलांचे लग्न लावून दिले. सर्व मागासवर्गीयांसाठी वस्तीगृहे बांधले मुस्लिमांच्या पवित्र कुराणाचे मराठीत भाषांतर करून दिले.
देश बचाओ थीमचे टी-शर्टचे वाटप
शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध चित्रकार नंदकुमार जोगदंड यांनी रेखाटलेल्या ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, देश बचाओ या थीमचे टी-शर्ट मोफत देण्यात आले. शाहू महाराजांच्या 148 व्या जयंतीनिमित्त 148 गरजू विद्यार्थ्यांना एक वर्ष पुरेल इतके शालेय साहित्याचे यावेळी मोफत वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शुभम गायकवाड यांनी केले. बी. टी भामरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ॲड. प्रवीण इंगळे, ॲड. अमोल घोबले, गौतम गायकवाड, प्रशांत इंगळे, एस. पी. पवार, अनिल दांडगे, प्रेम आर्या, फिरोज खान, ॲड. विलास बनकर, अंकुश पवार, साखरे मल्लेश यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव सोनवणे, हर्षानद हिवराळे, राहुल बोरडे, कबीर बोरडे, सोनू कांबळे, वैभव कांबळे, दिगंबर वाहुळे यांनी परिश्रम घेतले. मुकुल निकाळजे यांनी आभार मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.