आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान औरंगाबादच्या शाकीर सय्यद, वैदेही लाेहियाने शुक्रवारी घरच्या मैदानावर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. हे दाेघेही तलवारबाजी प्रकारात चॅम्पियन ठरले. तसेच गिरीशने सुवर्णपदकाची कमाई केली. औरंगाबाद येथे तलवारबाजीच्या इव्हेंटला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शाकीर, वैदेहीने आपले वर्चस्व राखत साेनेरी यश संपादन केले. यादरम्यान तेजस, वैभवी आणि कुमार शिंदेला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच पुण्यात औरंगाबादच्या महिला हाॅकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत नाशिकवर १४-० ने मात केली. बॅडमिंटनपटू स्मित ताेष्णीवाल आणि पुण्याच्या आर्य भिवपटकी सर्वाेत्तम खेळीमुळे महाराष्ट्र राज्य आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच सायकलिंगमध्ये पुण्याच्या सूर्या थाटूने किताबाचा बहुमान पटकावला. भिवपटकीने वरुण कपूरचा २१-११, २१-१५ ने पराभव करून आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले.
भाग्यश्रीचे ६ गाेल; औरंगाबाद विजयी: औरंगाबाद महिला हाॅकी संघाच्या भाग्यश्री ढेपेने शुक्रवारी नाशिकविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना गाजवला. तिने सामन्यात डबल हॅटट्रिक केली. तिने ६ गाेल केले. याच गाेलच्या बळावर औरंगाबादने १४-० ने सामना जिंकला. विजयात गाैरी मुकणे, श्रृती विधाते, विशाखाने प्रत्येकी २, पुनम वाणी व नाजुका माेहितेने प्रत्येकी १ गाेल केला.
टेबल टेनिसमध्ये सातव्या मानांकित अनन्या आणि ठाण्याच्या मुक्ता दळवीने महिला गटात द्वितीय मानांकित सेन्होरा डिसूझा आणि मुंबई शहराच्या मानसी चिपळूणकर यांचा ११-७, ६-११, ७-११, ११-३, ११-६ असा पराभव केला.
बीडच्या हनुमंतला कांस्य: शिर्डी-सिन्नर येथे रोड सायकलिंग स्पर्धेत पुण्याचा सूर्या थाटू चॅम्पियन ठरला. त्याने ८० किमीची राेड रेस २ तास १५ मिनिटे ५६ सेकंदांत पूर्ण करत अव्वल स्थान गाठले. बीडच्या हनुमंत चोपडेने कांस्यपदकाचा बहुमान पटकावला.
पुण्याची औरंगाबादवर ६-० ने मात :
बालेवाडीत पुणे पुरुष फुटबाॅल संघाने उपांत्यपूर्व फेरीत सतीश हवालदारच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर औरंगाबादवर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर मुंबईने सोलापूरवर ३-१ असा सहज विजय मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.