आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीदेव कायदामंत्री आणि गृहमंत्री:मी त्याला प्रार्थना केली होती; महाराष्ट्र आता राऊतांना घाबरेल - चंद्रकांत खैरेंचे लक्षवेधी विधान

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शनीदेव हे देवाचे कायदामंत्री आणि गृहमंत्री आहेत.'' असे सनसनाटी विधान औरंगाबादेतील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज केले. ''मी संजय राऊत यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली होती. आता महाराष्ट्र संजय राऊत यांना घाबरेल'' असे लक्षवेधक विधानही त्यांनी आज केले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज मुंबईतील पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर हायकोर्टात ईडीने धाव घेतली परंतु, हे प्रकरण सुनावणीसाठी उद्या घेऊ असे हायकोर्टाने सांगितले आहे. आता इतक्यातच संजय राऊत यांची सुटका होत आहे. त्या धर्तीवर चंद्रकांत खैरे यांनी हे विधान केले आहे.

जेलमध्ये वाचन, चिंतन, लिखाण

शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली. 100 दिवस राऊत जेलमध्ये होते, मात्र तिथेही त्यांचं वाचन, लिखाण आणि चिंतन सुरु होतं. आता ते बाहेर आले आहेत.

केला होता नवस

महाराष्ट्र आता त्यांना घाबरेल, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले. तसेच राऊत बाहेर येण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी विशेष पूजा केली होती. तसेच बाहेर आल्यानंतर कुटुंबासहित शनि शिंगणापूरला येऊ, असे राऊत यांनी कबूल केले होते.

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे मी त्याला प्रार्थना केली होती. चंद्रकांत खैरे हे शनी आणि हनुमान भक्त आहेत. दर शनीवारी ते भद्रा मारोतीलाही दर्शनासाठी जात असतात.

बातम्या आणखी आहेत...