आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक:परवानगी न घेता भरवलेली शंकरपट स्पर्धा थांबवली ; राज्यांतून आले होते स्पर्धक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पळशी गावात शनिवारी शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आयोजकांनी परवानगी न घेतल्याने पाेलिसांनी ही स्पर्धा थांबवली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथूनदेखील स्पर्धक आले होते.

पळशीचे माजी सरपंच आत्माराम पळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा हाेणार हाेती. प्रथम येणाऱ्या बैलजोडीस २१ हजारांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. ५० पेक्षा जास्त स्पर्धक यात सहभागी झाले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील चार ते पाच हजार प्रेक्षक अाले होते. मात्र केवळ परवानगीची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे चिकलठाणा पोलिसांनी ही स्पर्धा थांबवली.

बातम्या आणखी आहेत...