आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:शंकरराव नागरे यांना 75 व्या वर्षी पीएचडी; वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक शंकरराव नागरे यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी पीएचडी मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पीएचडी प्रदान केली. त्यांनी “गोदावरी खोऱ्यातील जलव्यवस्थापन : जायकवाडी प्रकल्पाचा अभ्यास’ विषयात संशोधन केले. त्यांनी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. एस. टी. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. डॉ. अशोक तेजनकर या संशोधनासाठी सहमार्गदर्शक होते.

नागरे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात कार्यरत असताना अनेक सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावली. त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जलव्यवस्थापन विषयात संशोधन केले आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्याबद्दल नागरे सातत्याने भूमिका मांडतात. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यासाठी जलसंपदा विभागातील जबाबदारी सांभाळून सायंकालीन वर्गात प्रवेश घेतला होता. या यशाबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रसिद्ध जलतज्ज्ञ माधवराव चितळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, सु. भी. वराडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...