आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:फोनवर माहिती शेअर केल्याने कुणी बुद्धिमान होत नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी मी पहाटेच्या फ्लाइटसाठी मुंबई विमानतळावर होतो. सिक्युरिटी लाइनमध्ये उभं राहून मी माझ्यामागे उभ्या असलेल्या प्रवाशाला मशीनमध्ये चेक करण्यासाठी जॅकेट काढण्याचा सल्ला दिला, नाही तर सुरक्षा कर्मचारीही तेच सांगेल आणि चिडेल. त्याने माझ्याकडे असे पाहिले जणू मी गुन्हा केला होता. रुक्ष स्वरात तो धन्यवाद म्हणाला आणि मग त्याला माझ्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही अशा थाटात दुसरीकडे पाहू लागला. त्याच्या धन्यवादामागे दडलेली भावना मी ओळखली, ‘तुमची बुद्धी तुमच्याकडे ठेवा. मी काय करत आहे हे मला माहीत आहे. तुमच्या सल्ल्याची गरज नाही.’ दरम्यान, माझ्या मनात फिरत राहिले की, ही व्यक्ती अशी का वागली? त्याने मला हाफ जॅकेट घातलेले पाहिले असेल आणि स्वतः जॅकेट घातलेला माणूस त्याला पूर्ण जॅकेट उतरवण्याचा सल्ला कसा देऊ शकतो, असा विचार करत मी स्वतःला थोडा दिलासा दिला. विमानतळांवरील सुरक्षा प्रोटोकॉलच्या दृष्टीने दोन जॅकेटमधील फरक स्पष्ट करतो. त्यापैकी एकाला मानेपर्यंत बटण असतात आणि ते शरीराला पूर्णपणे चिकटलेले असते, तर दुसरे सैल आणि शरीरापासून थोडे दूर असते. त्याने रुक्ष धन्यवाद देऊन त्याने मला जाणीव करून दिली आणि मीही होकारार्थी मान हलवून माफी मागितली. आमची पाळी आली तेव्हा सुरक्षा रक्षकाने मला बॉडी स्क्रीनिंगसाठी पुढे येण्यास सांगितले, माझ्यामागे असलेल्या गृहस्थाला स्क्रीनिंगसाठी जॅकेट काढण्यास सांगितले. ते गृहस्थ सुरक्षारक्षकाला म्हणाले, मला आधीच उशीर झाला आहे आणि सुरक्षा अधिकाऱ्याने उत्तर दिले, सर, हा सुरक्षा नियम आहे. मी मागे वळलो आणि त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नजर वळवली. सुरक्षा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मी हँडबॅग उचलली आणि पाहिले की, ती व्यक्ती अजूनही सुरक्षा प्रोटोकॉल संपण्याची वाट पाहत आहे. मला त्याचे वाईट वाटले.

आजकाल आपण पाहतो की, अनेकांना ते प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याचे वाटते, कारण वाचलेले असो की नसो, सोशल मीडियावर अनेक लेख फॉरवर्ड करतात! अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातील संशोधकांच्या नव्या अध्ययनानुसार, सोशल मीडियावर एक बातमी शेअर केल्याने लोकांना त्या विषयाबद्दल अधिक माहिती असल्याचे वाटते, पण प्रत्यक्षात तसे नाही.

जर्नल ऑफ कंझ्युमर सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अध्ययनात म्हटले आहे की, ‘त्यांना अधिक ज्ञान आहे असे वाटतो तेव्हा ते अधिक धोकादायक निर्णय घेतात.’ निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांनी अनेक अध्ययने केली. त्यांना आढळून आले की, लोक शेअरिंगला त्यांची संकल्पना मानतात, त्यामुळे त्यांना पोस्टमध्ये दाखवल्याप्रमाणेच ज्ञानी असल्याचे वाटते. शेअर केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो, कारण माहिती ऑनलाइन सार्वजनिकरीत्या शेअर केल्याने तज्ज्ञाची प्रतिमा तयार होते. त्यांना अधिक माहिती आहे, असे त्यांना खरोखर वाटते व असे केल्याने त्यांची एक स्वत:ची प्रतिमा तयार होते आणि त्यांना त्यांच्या पोस्ट्सप्रमाणेच ज्ञानी वाटण्यास मदत होते. संशोधनानुसार, पोस्ट करण्यापूर्वी प्रत्येकाने लेख वाचला तर त्याचे फायदे आहेत. लोकांना त्या विषयाची थोडीशी माहिती असेल तर नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी लेख वाचत नाहीत. संशोधनात म्हटले आहे की, ज्ञानाच्या या भावनेतील ही गडबड दूर करणे कठीण आहे.

फंडा असा ः कृपया लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती शिकूनच बुद्धिमान होते, सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करून नव्हे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...