आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेची मागणी:शर्मा, जिंदाल यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद; औरंगाबादसह सोलापूर, नगरमध्ये मुस्लिम संघटनांचे आंदोलन

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी राज्यभर उमटले. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूरहसह अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याची मागणी केली.

औरंगाबादमध्ये केली निदर्शने

औरंगाबादमध्ये शुक्रवारी सर्व मुस्लिम संघटना, पक्षाकडून विभागीय आयुक्त कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. दुपारची नमाज अदा झाल्यानंतर मोठा जमाव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वळाला. शर्माच्या व्यक्तव्याचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. जमावाने यावेळी शर्माचे पोस्टर जाळून फोटोवर चपलांचा मारा केला. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत

क्रांतीचौकात नोंदवला निषेध

औरंगाबादच्या काही मुस्लिम तरुणांनी कालही शहरातील क्रांतीचौक परिसरात नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या निषेध केला होता. यावेळी त्यांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली होती. यानंतर आज मुस्लिम समाजाच्या संघटनांनी नुपूर शर्माच्या विरोधात मोर्चा काढला असून, ते विभागीय आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

अहमदनगरमध्ये पाळला बंद

अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहराच्या बाजार पेठेत संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, सर्जेपुरा, कोठला भागातील बहुतांशी दुकाने शुक्रवारी बंद दिसून आली.

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अहमदनगर शहरातील कोठला भागात शर्मा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कापड बाजार, सर्जेपुरा, कोठला या भागातील दुकाने बंद होती.

आंदोलकांना घेतले ताब्यात

शर्मा यांच्याविरोधात कोठला येथे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे अहमदनगर -औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्याचबरोबर शहरातील कापड बाजार सर्जेपुरा व अन्य परिसरात पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...