आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाऊडस्पीकर:मशिदीत भोंगे हा मूलभूत हक्क नाही , अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला निकाल

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान करणे मूलभूत हक्क नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बदायूंचा रहिवासी इरफानची याचिका फेटाळत न्या. बी.के. विदला आणि न्या. विकास यांच्या पीठाने शुक्रवारी सांगितले की, अजान, इस्लामचा अविभाज्य भाग आहे. मात्र, लाऊडस्पीकरवर ती करणे मूलभूत हक्क नाही. यासंदर्भात याआधीही न्यायालयांनी निकाल दिला आहे. इरफानने नुरी मशिदीसाठी लाऊडस्पीकरवर अजानची परवानगी मागितली होती, मात्र न्यायपीठाने ती फेटाळली.

लाऊडस्पीकरवरून बेदम मारहाण; एक ठार
महेसाणा| गुजरातच्या महेसाणा जिल्ह्यात मुदारदा गावात मंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एक जणाला बेदम मारहाण करून ठार करण्यात आले. जसवंतजी ठाकोर(४०) असे मृताचे नाव आहे. गावातील माता मंदिरात भजन सुरू होते. तेव्हा सदाजी रावजी ठाकोरने लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाबाबत आक्षेप घेत जसवंत आणि त्याचा भाऊ अजितवर हल्ला केला. यात जसवंतचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...