आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचे वर्चस्व कायम:वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिरसाट समर्थकांची एकहाती सत्ता

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यापूर्वी शिवसेनेच्या 17 पैकी 16 उमेदवारांचे वर्चस्व याठिकाणी होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीत आमदार संजय शिरसाट यांची एकहाती सत्ता होती. राज्यात शिंदेसेना व शिवसेना अशी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट निवडणुकीला सामोरे गेले होते. संजय शिरसाट यांच्या गटाचे 11 उमेदवार निवडून येत एकहाती सत्ता मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी 16 वरुन पिच्छेहाट झाली आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार गटाला फटका बसणार का? अशी राजकीय वर्तुळातुन व स्थानिकांतून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे यापूर्वी केवळ एक सदस्य असणाऱ्या भाजपने यावेळी 2 जागांवर निवडून येत आपला आलेख उंचावत ठेवला आहे. तर शिवसेना पक्षाचे 4 उमेदवार निवडून आले आहेत.

नव्यांना संधी

यंदा विशेषतः आमदार शिरसाट गटाचे तसेच तीन टर्म ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या श्रीकृष्ण भोळे यांचा पराभव नवख्या विजय सरकटे या उमेदवाराने केलाय. तर दुसरीकडे मागील पंचवार्षिकला भाजपचे एकमेव निवडून आलेले अमित चोरडिया यांनासुद्धा नवख्या उमेदवार असणाऱ्या विष्णू उगले यांनी पराभूत केले आहे.

असे आहेत विजयी उमेदवार

वॉर्ड क्रमांक 1 - सुनील काळे, सुनिता राजेश साळे, छायाताई सोमीनाथ प्रधान

वॉर्ड क्रमांक 2- माधुरी राजन सोमासे, विष्णू उगले

वॉर्ड क्रमांक 3- सागर शिंदे, माया सतीश पाटील, राणी राम पाटोळे

वॉर्ड क्रमांक 4- संभाजी चौधरी, पुनम भोसले, सुरेखा लगड

वॉर्ड क्रमांक 5 - मंदाताई कैलास भोकरे, कमलताई कल्याणराव गरड, विजय सरकटे

वॉर्ड क्रमांक 6- श्रीकांत साले, उषा हांडे, रामदास गवळी

कोणाचे संख्याबळ किती

शिंदे गट - 11

भाजप गट - 2

शिवसेना - 4

बातम्या आणखी आहेत...