आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बिग ब्रेकिंग:शिंदेसेनेची रणनीती- आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र आज राज्यपालांना देणार

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तारुढ करण्यासाठी त्यांच्याकडून तासातासाची मोर्चेबांधणी केली जात आहे. शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र शुक्रवारी हे आमदार राज्यपालांना देतील. त्याचवेळी शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे. त्यानंतर काही तासातच शिंदे गट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीही भेट घेऊन विधीमंडळ गटनेतेपदी शिंदेंच्या निवडीचे पत्र देईल. तेथेही सह्यांची तपासणी, शिरगणती होईल. आणि प्रतोदपदी भारत गोगावलेच असल्याचेही पत्र दिले जाणार आहे.

असा ठरला तासातासाचा प्लॅन
1. शुक्रवारी आम्ही म्हणजे मूळ शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना देणार आहोत.
2. यानंतर राज्यपालांसमोर शिरगणतीही होईल.
3. नंतर विधानसभा उपाध्यक्षांनाही विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचे पत्र दिले जाणार.
4. तेथेही शिरगणती आणि उपाध्यक्षांनी सूचना केल्यास त्यांच्या समक्षच सह्यांची तपासणी होईल.
5. मूळ शिवसेना गटाच्या प्रतोदपदी गोगावलेंची नियुक्ती केल्याचे शिंदे यांचे पत्र उपाध्यक्षांना सुपूर्द करणार.
6. याच कालावधीत राज्यपाल विधानसभेत आम्हाला शक्तीपरीक्षणाची तारीख देत सुचना करतील.
7. भाजपचे नेतृत्व आणि एकनाथ शिंदे मिळून पुढील ४८ तासांची पावले उचलतील व निर्णय घेतील.
8. रविवारी सायंकाळी सत्तांतराचे चित्र स्पष्ट होईल.

पवारांच्या चालींवर लक्ष ठेवण्यासाठी आमदारांचा गट

पहाटेच्या सत्ता स्थापनेवेळी शरद पवारांनी भाजप व अजित पवारांचा डाव उधळला होता. त्यामुळे आता ते काय चाली खेळू शकतात, याचा सखोल अभ्यास करून प्रतिचालींसाठी शिंदे समर्थक आमदारांचा स्वतंत्र गट लक्ष ठेऊन आहे. पवारांच्या कोणत्याही विधानावर मुळीच विश्वास ठेवायचा नाही, असे या आमदारांच्या गटाचे प्रमुख सूत्र आहे.

आपल्यासोबत राष्ट्रीय महाशक्ती आहे : शिंदे

गुवाहटीच्या हॉटेलात शिंदे समर्थक आमदारांची गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. त्यात परंड्याचे आ. तानाजी सावंत यांनी सर्वांच्या वतीने निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदेंना देत असल्याचे जाहीर केले. त्यावर शिंदे म्हणाले, ‘आता जे काही सुख- दु:ख असेल ते आपल्या सगळ्यांचे आहे. एकजूटीने राहू. एक नॅशनल पार्टी जी महाशक्ती आहे त्यांनी मला सांगितलंय, तुमचा निर्णय एेतिहासिक निर्णय आहे. तुमच्या मागे आमची पूर्ण शक्ती आहे.जे काही लागेल ते कमी पडणार नाही.’

गुवाहाटीत जमलेल्या बंडखोर आमदारांना संबोधित करतानाचा एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक नॅशनल पार्टी आपल्यासोबत असून वे‌ळोवेळी ती आपल्याला हवी ती मदत करणार असल्याचे ते यात सांगत आहेत. ‘त्या’ पक्षाने शिंदे गटाला जणू हा ब्लँक चेक दिला असून, त्याआधारेच आता शिंदे आणि त्यांचे ४९ समर्थक आमदार आता पुढील भूमिका निश्चित करणार आहेत. हा पक्ष कोणता यावर मात्र स्पष्टपणे कुणीच बोलायला तयार नाही. शरद पवार यांनीही ‘त्या’ पक्षाचे नाव घेणे टाळत, नॅशनल पक्षांची यादीच वाचून दाखवली.

47 (शिंदेसेना + सहयोगी) + 112 (भाजप+सहयोगी) = 159 स्पष्ट बहुमत देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार 288 सदस्यांच्या विधानसभेत शिंदेसेनेच्या मदतीने स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्ता मिळवेल.

17 (शिवसेना) + 53 (राष्ट्रवादी) + 44 (काँग्रेस) = 114 ( बहुमत नाही) ठाकरेंना व्हावे लागेल पायउतार बहुमताचा 145 हा जादुई आकडा टिकवता न आल्याने ठाकरेंचे सरकार पायउतार होईल.

बातम्या आणखी आहेत...