आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:2500 महिलांना शिर्डी; शनिशिंगणापूर देवदर्शन

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे गुरुवारी अडीच हजार महिलांनी देवगड-शिर्डी-शनिशिंगणापूर देवदर्शन घेतले, असा दावा करण्यात आला.हर्सूल टी पॉइंट येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी महिलांनी गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत देवगड-शिर्डी-शनिशिंगणापूर येथे देवदर्शन घेतले.

याप्रसंगी फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महेश माळवतकर, कल्याण गायकवाड, सागर पाले, राजेश देशमुख, विशाल दाभाडे यांची उपस्थिती होती. देवदर्शनासाठी अध्यक्ष विजय औताडे, भाग्यश्री औताडे यांनी पुढाकार घेतला. श्रीगणेश मिरवणुकीला सकाळी ११ वाजता राजाबाजार येथून प्रारंभ होणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...