आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय घडामोडी:शिरसाट : निधी मिळण्यात राष्ट्रवादीचा अडसर, चव्हाण : सर्वाधिक निधी शिरसाटांनाच मिळाला

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदेंसोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना निधी मिळण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडसर येत होता, असा आरोप केला. शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळ दिले जात होते. त्यामुळेच आम्ही शिंदेसोबत आलो आहोत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात सर्वाधिक निधी शिरसाट यांनाच मिळाला. म्हणूनच ते शिंदेंसोबत गेले. तरीही ते राष्ट्रवादीवर टीका करणारी भाजपची स्क्रिप्ट वाचत आहेत.

आमदार सतीश चव्हाण ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, आमदार शिरसाट यांची टीका, आरोप योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि निधीचा संबंध नाही. शिरसाटांनी आता ते भाजपकडून लढणार आहे की शिवसेनेकडून हे स्पष्ट करावे.

माझ्यावर बंधने : भुमरे मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणाबाबत संदिपान भुमरे म्हणाले की, माझ्यावरील बंधनामुळे जास्त बोलू शकत नाही. पण मी शिंदेंसोबतच आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना बुधवारी सायंकाळी ७.२४ वाजता कॉल केला असता त्यांचा मोबाइल स्विच ऑफ होता. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे कॉल उचलत नाहीत. आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मोबाइल सोमवारपासून बंदच आहे. तो सुरू झालेलाच नाही.

ठाकरे सरकार जाणार हे निश्चित : डॉ. भागवत कराड दरम्यान, दीर्घकाळ काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत राहिलो तर पुन्हा निवडून येणार नाही, याची खात्री पटल्यावर शिवसेनेच्या ४० आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मी मुंबईत दाखल झालो आहे. आता हे सरकार जाणार याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले.