आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत खैरेंना वेड लागलंय:शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर; म्हणाले- त्यांनी या वयात तरी उपचार करून घ्यावेत

मयूर वेरूळकर । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत खैरे वेडा झालाय. त्यांनी उपचार घ्यावे, असे शिंदें गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. खैरे तीन वर्षांपूर्वी मी काय म्हणालो, ते सांगत आहेत. मात्र, तेव्हा असे काहीच नव्हते. निवडणुकांच्या काळात हे कसे शक्य होते, असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

आमदार शिरसाट म्हणाले?

चंद्रकांत खैरे हा माणूस वेडा झाला आहे. त्यांनी या वयात तरी स्वत:वर उपचार करून घ्यावेत. तीन वर्षांपासून असे काहीच नव्हते. चंद्रकांत खैरे असे बोलूच कसे शकतात, असा प्रश्न उपस्थित करत संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंवर टीका केली. गेले 2 ते 3 महिने शहरात चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट यांच्यात वाद असल्याचे दिसून आले होते. आता या दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

औरंगाबादेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. 3 ते 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 आमदारांचा गट घेऊन काँग्रेस पक्षात दाखल होणार होते. आणि ही गुप्त बातमी आपल्याला खुद्द शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनीच सांगितली होती. असा गौप्यस्फोट खैरेंनी आज केला आहे.

चव्हाणांची केली पाठराखण

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड करून आपल्यासह 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या आणि राज्यात भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी आपण बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्त्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हे बंड केल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीला आपला विरोध असल्याचीही भूमिका शिंदेंनी घेतली होती. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठराखण करत हे करे असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे 2014 ते 19 सरकार होते. यावेळी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. या प्रस्ताव घेऊन येणाऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा मी या शिष्टमंडळाला आधी शरद पवारांशी चर्चा करावी असा सल्ला दिला होता. मात्र, ते शरद पवारांना भेटले नाहीत आणि पुढे काय झाले याबद्दल मला माहिती नाही, असे चव्हाणांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...