आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Shiv Jayanti 2022 | Shivaji Maharaj Statue Aurangabad | Kranti Chowk Shivaji Maharaj Statue Aurangbad | Unveiling Of A Statue Of Shivaji Maharaj; Jayanti Excitement 24 Hours In Advance In Aurangabad

क्रांती चौक बनला शिवतीर्थ:शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; औरंगाबादेत 24 तास आधीच जयंतीचा उत्साह

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी देशभर उत्साहात साजरी केली जाते. औरंगाबादही त्याला अपवाद नव्हते. मात्र यंदा २४ तास आधीपासूनच म्हणजे १८ फेब्रुवारीपासूनच या साेहळ्याचा अमाप उत्साह शहरात दिसून आला. त्याला निमित्त होते क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य 21 फुटी अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचे.

गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पुतळ्याचे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास अनावरण करण्यात आले अन‌् उपस्थित हजाराे शिवप्रेमींचा उत्साह टिपेला पाेहाेचला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घाेषणांनी क्रांती चाैक दणाणून गेला. या परिसराला शिवतीर्थाचेच रूप आले हाेते.

सकाळपासूनच शहरातील वातावरण भारावून गेले हाेते. शिवप्रेमींचे जत्थेच्या जत्थे क्रांती चाैकाच्या दिशेने येत हाेते. केवळ औरंगाबाद शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातून माेठ्या संख्येने शिवप्रेमी आले हाेते. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही लक्षणीय हाेती. भगवे झेंडे फडकावत, ढाेल-ताशांचा गजर करत व मराठमाेळ्या पेहरावात शिवप्रेमींनी रॅलीही काढली हाेती.

शेकडाे दिव्यांनी उजळला परिसर
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सायंकाळी सात ते पावणेआठ वाजेच्या दरम्यान शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले. सुमारे ६०० हून अधिक ढाेल- ताशांच्या गजराने परिसर दणाणून गेला हाेता.

आज हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी
शनिवारी सकाळी १० वाजता क्रांती चाैकातील पुतळ्यासह शहर व जिल्ह्यातील महापुरुषांच्या २५० स्मारक व पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. रतलाम, मनसूर, इंदूर, गुजरात, बडोदा, अहमदाबाद, शिर्डी, नाशिक, नांदेड येथून साडेतीन टन फुले आणली आहेत. यात तीन प्रकारचे गुलाब, मोगरा आदी फुलांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...