आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत शिवप्रेमी आक्रमक:राज्यपाल कोश्यारींच्या नावाने बोंबा मारून निषेध, मंत्री सावेंच्या घरासमोर ढोल वाजवून आंदोलन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवप्रेमींनी रविवारी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या मोर मॉल,शहानुर मिया दर्गा येथील निवासस्थानासमोर ढोल वाजवून तीव्र निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांच्या नावाने बोंबा मारून संताप व्यक्त केला.

राज्यपालांची हकालपट्टी करा

मराठी अस्मितेचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असूनही अतुल सावे यांनी राज्यपालांच्या स्पष्ट आणि थेट निषेध केला नाही. याबद्दल तीव्र नाराजी शिवप्रेमींनी व्यक्त केली. छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही असा इशारा मंत्री सावे यांच्या घरासमोर आंदोलकांनी दिला आहे.

राज्यपालांच्या नावाने बोंबाबोंब

आंदोलकांनी ढोल वाजवून व बोंबा मारून संताप व्यक्त केल्यनंतर मंत्री अतुल सावे यांना राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबदल चुकीचे विधान केले, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले होते. त्या नंतर चुकीच्या विधानाची माहिती देऊन राज्यपालांना तातडीने हटवण्यात यावे, यासाठी पुढाकार घ्यावा. विधिमंडळाच्या सभेत प्रश्न उपस्थित करावे, अशी मागणी करण्यात आली. शिवभक्तांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील असे आश्वासन सावे यांनी दिले.

उद्या राष्ट्रपतींना निवेदन

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव´ या मागणीसाठी आंदोलन सप्ताह पाळण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि राज्यपालांना पाठीशी घालणारा नेत्यांना जाब विचारण्यात यावा यासाठी अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उद्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांना तातडीने हटवण्यात यावे, यासाठी राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्याठी मोहीम राबवण्यात येणार आहे.

काळे कपडे घालून निषेध

अनेक आंदोलकांनी काळे कपडे घालून राज्यपालांच्या चुकीचे विधानाचा निषेध नोंदवला. आठ दिवस अशाच प्रकारे विविध माध्यमातून आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...