आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी:अन्यथा जनता तुम्हाला टकमक टोकावर घेऊन जाईल; अंबादास दानवेंचा इशारा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राज्यपालांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता तुम्हाला टकमक टोकावर घेऊन जाईल असा इशारा अंबादास दानवेंनी दिला आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी यांच्या महाराजांबद्दलच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तर विरोधकांकडून देखील टीका होतांना पाहायला मिळत आहे.

दानवे काय म्हणाले?

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राज्यपाल असो की भाजपचे प्रवक्ते, आमदार यांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध टीका करण्याचा विडा उचलला आहे. ज्या प्रकारे अफजल खान टीका करत होता तशी टीका सध्या सुरू आहे असा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी, खास करून राज्यपालांनी देखील नाक रगडून माफी मागावी. अन्यथा जनता त्यांना टकमक टोकावर घेऊन जाईल, असा इशाराच अंबादास दानवेंनी दिला आहे.

गद्दारांनी देशप्रेम शिकवू नये

अंबादास दानवे म्हणाले की, ज्या लोकांनी स्वत:च्या पक्षासोबत गद्दारी केली, त्या लोकांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये, असा टोला दानवे यांनी लगावला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, जी लोके शिवरायांचा अपमान सहन करतात अशा लोकांनी देश प्रेमावर बोलण्याची गरज नाही, असेही दानवे म्हणाले. ज्यांनी स्वताच्या पक्षात गद्दारी केली, त्यांनी देशप्रेमाच्या गप्पा मारु नये, शिवसेनेला देश प्रेम शिकवण्याची गरज नाही.

बातम्या आणखी आहेत...