आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौलताबाद:दौलताबाद येथील शिवसेना उपतालुकाप्रमुखाच्या आत्महत्येनंतर तणाव; कुटुंबीयांकडून हत्येचा आरोप

दौलताबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांच्या मते ही आत्महत्याच, एका महिलेवर गुन्हा दाखल

दौलताबाद येथील शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य सुनील प्रकाश खजिनदार (३५) याचा मृतदेह गल्लीतच राहणाऱ्या एका महिलेच्या घरी गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह लोखंडी साखळीला लटकलेला होता. त्याचे दोन्ही पाय पलंगावर टेकलेले होते. त्यामुळे ही आत्महत्याच नसून खून असल्याचा आरोप कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी केला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तीन तास मृतदेह रुग्णवाहिकेत पडून होता. अखेर दौलताबाद पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उपसरपंच सय्यद शेरू यांनी सुनीलने शेख लतिफच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना दिली. पोलिसांनी धाव घेत सुनीलचा मृतदेह तपासणीसाठी घाटीत पाठवला. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून अकराच्या सुमारास दौलताबाद पोलिस ठाण्यात मृतदेह आणण्यात आला. तोपर्यंत पडेगाव, दौलताबाद येथील शिवसैनिकांची गर्दी जमा झाली होती.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुनीलची आत्महत्या नसून खून असल्याचा अाराेप केला. यात तीन ते चार जणांचा हात अाहे. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे आणि सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी योग्य तपास करू, असे अश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी शेख शिरीन (३३) हिला पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. मृत सुनीलचे माळीवाडा रोडवर मोबाइलचे दुकान आहे, तर माेठा भाऊ अनिलचे बसस्थानकाजवळ कटिंग सलून आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तो सदस्य म्हणून निवडून आला होता. पुढील तपास छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वायळ करीत आहेत. दाैलताबाद पोलिस ठाण्यासमोर शिवसैिनकांचा जमाव जमला होता.

खुनाचा आरोप का? :
-सुनीलने आत्महत्या केलेल्या पलंगावर उभे राहिले तर हात छताला लागतो. त्या ठिकाणी आत्महत्या करता येणे शक्य नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला.
-घरात दोरी किंवा इतर गोष्टी असताना आत्महत्येसाठी साखळदंड का वापरले? आत्महत्येत गळ्यावर इंग्रजी व्ही अक्षरासारखा व्रण तर गळा आवळला असेल तर ओ सारखा व्रण उमटताे. मात्र, साखळीमुळे हा व्रण नीट लक्षात येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
-सुनीलला दुपारी अडीच वाजता घरी बोलावून कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्राथमिक अहवालानुसार गळ्याला फास बसल्यामुळे मृत्यू झाला असे दिसते.

सुनीलचा साखरपुडा झाला हाेता : पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील आणि शिरीन यांच्यात मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी सुनीलचा साखरपुडा झाला होता. काही दिवसांतच त्याचे लग्न होते. यावरून दाेघांत वाद झाले असावे. सुनीलने त्यांच्या कुटुंबीयांनादेखील ही माहिती दिली हाेती. शिरीन सुनीलला धमकावत असल्याचा संशय आहे. तिचे माहेर आणि सासर दौलताबादच आहे. तिचा पती लतिफ हा औरंगाबादेत एका कपड्याच्या दुकानावर काम करतो. घटना घडल्यापासून तो गावात आला नाही. मात्र तो फरार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...