आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता:रावसाहेब दानवे चकवा, संदीपान भुमरेंना आजपासून मी बोक्याच म्हणणार- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात आज सभा घेत ठाकरे गटांवर कडाडून टीका केली. त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही हल्लाबोल केला. संदीपान भुमरे डाकू माणूस आहे, त्यांच्या सभेला कोण येणार? बाहेरून लोक आणली गेली, अशी टीका खैरे यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे संदीपान भुमरेंना बोक्या म्हणाले. यापुढेही आम्हीही भुमरेंना बोक्या म्हणणार. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणात दम नव्हता. आजची सभेची स्पाॅन्सरशिप भाजपची होती, असा टोलाही खैरेंनी यावेळी लगावला.

सीएम दबावाखाली दिसले

चंद्रकांत खैरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या भाषणात दम नव्हता. ते टेन्शन आणि प्रेशरमध्ये बोलताना दिसले. या सभेसाठी पैठण तालुक्यातील मोजकेच लोक होते. ही सभा पैठण तालुक्याची नव्हती तर, नगर, परभणी, जालना, येथील लोकच जास्त होती.

संदीपान भुमरे डाकू

चंद्रकांत खैरे म्हणाले, संदीपानभुमरे हा डाकू माणूस आहे. त्यामुळे डाकूच्या सभेला पैठणचे लोक येणार नाही, याची त्यांनाही कल्पना होती म्हणूनच सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना तीनशे रुपये आणि पुरुषांना पाचशे रुपये दिले जात होते. या सभेसाठी औरंगाबाद शहरातील नारेगाव, चिकलठाणा, घनसावंगी, पाथर्डी, नेवासा , शेवगाव, सिल्लोड येथून लोक पैठणला नेण्यात आले.

भाजपच्या सहकार्याने सभा

चंद्रकांत खैरे म्हणाले, संदीपान भुमरे आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने पैठणला सभा घेतली. या सभेत भाजपचे दोन केंद्रीय राज्य मंत्री होते. अनेक नेतेही होते. भाजपची एक स्टाईल आहे, त्यांची कमळाची निशाणी लपत नाही आणि सभेत तेच दिसले. मुख्यमंत्री शिंदेंची भाजप स्पाॅन्सर सभा आज झाली.

पैसे देऊन लोक खुर्चीवर बसवले

खैरे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, आम्ही आदित्य ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादीचे लोक आणले. हे साफ चूक आहे. आमची सभा अर्धा तासच झाली त्यातही लोक उभे होते. त्यांना पैसे दिले गेलै नव्हते. आज मुख्यमंत्र्यांच्या सभेत लोक खुर्चीवर होते. त्यांना पैसे देऊन आणले गेले.

आम्हीही भुमरेंना बोका म्हणू

खैरे म्हणाले, रावसाहेब दानवे स्वःत चकवा आहेत आणि आज ते संदीपान भुमरेंना बोका म्हणाले. आम्ही पण भुमरेंना आजपासून बोकाच म्हणू. सरन्यायाधीशांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची उपस्थिती कशाला हवी, त्याचे मुख्यमंत्र्यांनी आज समर्थन केले पण या सुप्रीम कोर्टात मोठी केस असताना मुख्यमंत्र्यांना संकेत समजत नाही. चूक बार असोसिएशनची असेलही पण न्यायपालिकेबाबत सम्रंभ होऊ नये. त्यांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होते.

बातम्या आणखी आहेत...