आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Shiv Sena Leader Chandrakant Khaire's Demand To Chief Minister Uddhav Thackeray To Open Temples In The District For Shravan Month On Terms And Conditions

मुख्यमंत्र्यांना पत्र:श्रावण महिन्यासाठी नियम व अटीवर जिल्ह्यातील मंदिरे खुली करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेने नेते चंद्रकांत खैरेंची मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा कहर आहे. अशात राज्यातील सर्वत धार्मिक स्थळेही ही बंद आहेत. दरम्यान आता श्रावण महिना सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे.  'श्रावण महिना सुरु झाला आहे. . त्यामुळे मंदिरं खुली करा, मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यास परवानगी द्या. श्रावणा सारख्या पवित्र महिन्यात  लोकांना मंदिरात जाऊन व्रत वैकल्य, धार्मिक विधी, पुजा करता येणे शक्य होईल.', अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामार्फत केली आहे'

पत्रामध्ये लिहिण्यात आले की, नागरिकांनी आता स्वःतची काळजी, सोशल डिस्टन्स्टींगचे नियम, नियमित मास्कचा वापर करत घ्यायची आहे. लोकांना हे समजले असून त्या पद्धतीने लोकांमध्ये बदल देखील दिसून येत आहेत.  बाजारपेठा व व्यववहार सुरू झाल्यामुळे आता हिंदूंची धार्मिक स्थळ, मंदिरे देखील खुली केली जावीत. जेणेकरून श्रावणा सारख्या पवित्र महिन्यात  लोकांना मंदिरात जाऊन व्रत वैकल्य, धार्मिक विधी, पुजा करता येणे शक्य होईल.

लाॅकडाऊनमुळे धार्मिक विधी, पुजेचे साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रे्त्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मंदिरेे सुरू झाली, तर त्यांना देखील आधार मिळेल. कोरोनाचा धोका  टळलेला नाही,  याची पुर्ण जाणीव आहे, त्यामुळेच सुरक्षित अंतर, मास्कचा वापर या शिवाय रा्ज्य सरकारकडून ज्या सूचना दिल्या जातील, त्याचे पालन करण्याचा हमी व अटीवर मंदिरे  खुली करण्याची परवानगी द्यावी, असेही चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.