आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंचा भाजपवर घणाघात:पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांनी काय केले, पाणी देऊ शकले नाहीत; औरंगाबादच्या सभेत चंद्रकांत खैरेंची भाजपवर टीका

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेवेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र डागले आहे.

शहराला औरंगाबाद नाव नकोच

संभाजीराजेंना त्रास दिलेल्या माणसाचे नाव का औरंगाबाद शहराला का असावे असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांनी विचारले आहे. फडणवीसांनी पाच वर्षे सत्तेत असताना काय केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपने माझ्या पराभवासाठी प्रयत्न केले. असे म्हणत किरीट सोमय्यांचे तोड लाल करू असे म्हटले आहे. तर औरंगाबादमधील भाजपचे दोन आमदार येणाऱ्या काळात पाडावे असेही त्यांनी म्हटले आहे.

औैरंगाबाद मनपा शिवसेनेचीच

शिवसेनेचा भगवा औरंगाबाद मनपावर फडणकणार आहे. असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका करतात, मात्र यानंतर आम्ही हे खपवून घेणार नाही असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

भाजपने हिरवा झेंडा चढवला

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, माझ्या निवडणुकीवेळी रावसाहेब दानवे हे भाजप अध्यक्ष होते, पण त्यांनी युती धर्म पाळला नाही. हॉस्पिलमध्ये दाखल असल्याचे नाटक करून छत्रपतींचा भगवा झेंडा खाली उतरवला. रझाकारांचा हिरवा झेंडा चढवला. आता आमचा अर्जुन बाण जिंदाबाद आहे. भाजपवाले आमच्या मातोश्रीवर, उद्धवसाहेब, मुलांवर, संजय राऊतांवर बोलत असतील, तर सहन नाही करणार नाही. किरीट सोमय्याला सांगू इच्छितो, तू थोबाड वाकडे करून बोललास, तर तुझे थोबाड लाल करू. आमच्या उद्धव साहेबांना अरे, तुरे बोलल्याले सहन करणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत.

बातम्या आणखी आहेत...