आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंत्र्यांना कोरोना:शिवसेनेचे मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, स्वतःला घरातच केले क्वारंटाइन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीबाबत शंका आल्याने त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाइन केले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य तो उपचार घेऊन "होम क्वांरांटाईन" व्हावे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. कोरोना काळात सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीतचा आढावा घेत होते. 

सोशल मीडियावरून दिली माहिती 

थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही ,या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.

मुंबई येथील लीलावती रुग्णालयातील डॉ जलील पारकर साहेबांचे उपचार घेतले असून मी मुंबई येथेच "होम क्वांरांटाईन" आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य तो उपचार घेऊन "होम क्वांरांटाईन" व्हावे, असे सत्तार म्हणाले.