आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तारांवर अंबादास दानवेंची टीका:डरपोक राजकारणी म्हणत आगामी निवडणुकांत बंडखोरांना धडा शिकवण्याचा इशारा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार डरपोक राजकारणी आहेत. ते व्यावसायिक राजकारण करतात, असा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौरावर असताना सिल्लोड येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याबाबत दानवे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सत्तार यांच्यावर टीका केली.

बंडखोरांना उद्ध्वस्त करू

पक्षबांधणीसाठी शिवसेनेच्यावतीने 5 ते 20 ऑगस्टदरम्यान 'आपला भगवा, आपली शिवसेना' शिवसंवाद दौराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दानवे म्हणाले, आमची संघटना शांत का बसली आहे, असा सवाल वारंवार विविध व्यासपीठावरून केला जात आहे. मात्र, आम्ही सकारात्मक राजकारण करणारे आहोत. शोबाजीचे राजकारण आम्ही करत नाहीत. आगामी निवडणुकीत आम्ही बंडखोरांना उद्ध्वस्त करू. तसेच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील 27 जुलैनंतर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

शिवसेनेला फरक पडत नाही

अंबादास दानवे यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसैनिक तयार आहेत. बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेला काहीही फरक पडलेला नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत आमचे आत्तापेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी या मोहिमेची मुंबईची माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...