आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकी धोक्यात:शिवसेनेच्या आमदार लता सोनवणेंना धक्का; जातवैधता प्रकरणात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची जातवैधता प्रकरणातील याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. ​​​ सोनवणे अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी या जातीच्या प्रमाणपत्रावर चोपडा मतदार संघातून निवडून आल्या आहेत. खंडपीठाने चार आठवड्यांसाठी आमदार सोनवणे यांच्यावर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने कुठलीही फौजदारी कारवाई करू नये असेही स्पष्ट केले आहे.

नेमके प्रकरण काय?

आमदार सोनवणे यांच्या जातीच्या दाव्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या जातीच्या दाव्यासंबंधी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती. डिसेंबर 2021 मध्ये जात प्रमाणपत्र तपासणी समितीने संबंधित दावा अवैध ठरवला होता.

खंडपीठात याचिका

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबारच्या निर्णयाविरुद्ध आमदार लता सोनवणे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले होते. नंदुरबार तपासणी समितीचा निर्णय रद्द करून अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी हे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात यावे अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती.

प्रमाणपत्र रद्द करावे...

प्रतिवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार वळवी यांनी सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती. वळवी यांच्यावतीने वकील योगेश बोलकर यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्या सोनवणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ आर. एन. धोर्डे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...