आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

परभणी3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक
  • जिंतूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीवरुन नाराजी

परभणी विधानसभा मतदारसंघात दोन वेळा आमदार राहिलेली व खासदारकीची दुसरी टर्म भूषवित असलेले शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोफ डागत शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे .

जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे व खासदार संजय जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे . सातत्याने या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या चालत आलेल्या आहेत . राज्यातील सत्तेच्या बदललेल्या समीकरण नंतरही राष्ट्रवादीचे श्री भांबळे यांच्याशी खासदार जाधव यांचे कुठल्याही प्रकारची सख्य नव्हतेच. त्यातच जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्तीची नियुक्तीचा वाद समोर आला . गेल्या आठ महिन्यांपासून खासदार जाधव या बाजार समितीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील होते. तसा तर त्यातही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने तगादा लावला होता . त्यानंतरही जिंतूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रशासक म्हणून राहिले त्यानंतर तरी दुसऱ्या टर्ममध्ये बाजार समितीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागेल या अपेक्षेत असलेल्या खासदार जाधव यांना दोन दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला. राज्य सरकारने या बाजार समितीवर राष्ट्रवादी च्या सदस्यांची वर्णी लावल्याने खासदार जाधव यांचा मोठा हिरमोड झाला.

या संदर्भात जाधव यांनी मंगळवारी पक्षप्रमुख ठाकरे यांना आपले राजीनामा पत्र दिले आहेत. त्यात राज्यात सरकार असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागू नये ही दुर्दैवी बाब असल्याचे नमूद करीत जिंतूर मध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून अशी नियुक्ती होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करीत सामान्य कार्यकर्त्यांना खासदार म्हणून आपण न्याय देऊ शकत नसेल तर या पदाचा काय उपयोग असे नमूद करीत जाधव यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना राजीनामा पत्र दिले आहे .आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असं भविष्यातही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करू असेही खासदार जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान खासदार जाधव यांच्या या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहेत.