आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरपारची लढाई लढणार:शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा इशारा; ईडीविरोधात औरंगाबादमध्ये निदर्शने

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरात शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आगामी काळात ईडीविरोधात आरपारची लढाई लढू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला.

केंद्र सरकार राजकीय आणीबाणी निर्माण करत आहे. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी ईडीचा वापर करत आहे. आम्ही ईडीला घाबरणार नाही. आगामी काळात यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करून उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. यावेळी आमदार अंबादास दानवे, राजू वैद्य, कृष्णा पाटील डोणगावकर, बाळासाहेब थोरात, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकशीची गरज

क्रांती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, ईडीवाल्यांची चौकशी करण्याची गरज आहे. तसेच बंडखोर आमदार गुजरात, गुवाहाटी या ठिकाणी वास्तव्यास होते. त्याचा खर्च कोणी केला ? याची चौकशी करण्याची गरज आहे. आगामी काळात आम्ही आरपारची लढाई लढू, असा इशाराही खैरे यांनी दिला

केंद्र सरकारविरोधात घोषणा

भाजप सरकार डरती है ईडी को आगे करती है, या ईडीचे करायचे काय खाली मुंडक वर पाय, नरेंद्र मोदी हाय हाय,अमित शहा हाय हाय, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...