आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षे शहराला व्याकूळ ठेवणाऱ्या:शिवसेनेचंही पाणी पाणी..! ; सत्ताधाऱ्यांना उशिराचे शहाणपण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९८६-८७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेने औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मनपा मुख्यालयावर तुफानी आक्रमक मोर्चा काढला होता. महिलांनी उपायुक्तांच्या टेबलवर माठ फोडले, हंडे आपटले. त्यानंतर सुमारे ३५ वर्षांनी पहिल्यांदाच पाणीटंचाईसाठी शिवसेनेच्या आमदार, पाच माजी महापौरांचे शिष्टमंडळ मनपा प्रशासकांच्या दालनात पोहोचले. तासभराच्या चर्चेत ढीगभर सूचना केल्या. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही काही सूत्रे हलवली. याचा परिणाम म्हणजे १७ लाख औरंगाबादकरांना नऊ-दहाएेवजी सात दिवसांनी एकदा पाणी मिळणार आहे,पण तेही दोन आठवड्यांनी. दुसरीकडे जलकुंभावर आंदोलन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. सध्या अनेक वसाहतींना नऊ-दहा दिवसांआड पाणी येते. काही ठिकाणी चार दिवसांआड पुरवठा होत आहे. त्यामुळे लाखो लोक हैराण झाले आहेत. त्यांच्यासाठी ३० मार्च रोजी राष्ट्रवादी तर ४ एप्रिल रोजी भाजपने आंदोलन केले. त्यावर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केलेल्या ९ कलमी कार्यक्रमाचा उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यावर भाजपने तीन दिवसांपूर्वी एन-७ जलकुंभावर मुक्कामी आंदोलन केले. ललित सरदेशपांडे या शिवसैनिकाने अंगावर डिझेल ओतून घेतले.

मग माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख हेमंत कोल्हे यांच्यावर आगपाखड केली. यातून काहीही साध्य होत नसले तरी किमान भाजप आपली व्यथा मांडत असल्याचे लोकांना वाटत आहे. हे लक्षात आल्यावर आमदार अंबादास दानवे सोमवारी सकाळी माजी महापौर किशनचंद तनवाणी, त्र्यंबक तुपे, विकास जैन, कला ओझा, नंदकुमार घोडेले यांना घेऊन पांडेय यांच्या दालनात शिरले. जायकवाडीत मुबलक साठा असूनही पाच दिवसांआड पाणी का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. अधिकाऱ्यांशी समन्वय साधून दोन दिवसांआड पाणी द्या, असे ते म्हणाले. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख विनायक पांडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, माजी नगरसेवक सीताराम सुरे आदी होते.

हनुमान टेकडी, उल्कानगरीचीही व्यथा : याशिवाय माजी नगरसेवक सचिन खैरेंच्या नेतृत्वात हनुमान टेकडी, तर माजी सभापती दिलीप थोरात, शिवप्रसाद जाजूंच्या नेतृत्वात उल्कानगरीतील शिष्टमंडळाने पांडेय यांच्याकडे व्यथा मांडली. उल्कानगरीत जुनी पाइपलाइन बदलावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहराचा कुणी विचार करत नाही : आमदार दानवे - पाणी वितरणाचे नियोजन बिघडले आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. राजकारण आहे. लाइनमन दारू, पैसे मिळाले तर पाणी सोडतात. अधिकारी आपापल्या भागात पुरवठा होईल, एवढेच बघतात. शहराचा कोणीच विचार करीत नाही.

माजी महापौरांच्या सूचना अशा-
नंदकुमार घोडेले : खासगी विहिरींचे अधिग्रहण करा. बांधकाम व इतर व्यावसायिकांची पाणी कपात करा.
त्र्यंबक तुपे : नवीन वसाहतींना टँकरने पाणी द्या. जलवाहिन्यांवर जागोजागी व्हॅाल्व्ह बसवा.
कला ओझा : सावंगी तलावातून दोन एमएलडी पाणी हर्सूल तलावात आणावे.

बातम्या आणखी आहेत...