आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दोन महिन्यांत शिवाजीनगर रेल्वेगेटला पाचव्यांदा धडक; चालकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिवाजीनगर येथील रेल्वेगेटला सोमवारी दुपारी २ वाजता बोलेरो पिकअप वाहनाने धडक दिली. यात स्वयंचलित गेटची यंत्रणा बंद पडल्याने वाहनधारकांची फजिती झाली. याप्रकरणी आरपीएफच्या जवानांनी वाहनचालक मनोज काथारे (३४, पुंडलिकनगर) याच्यावर कारवाई करत वाहन जप्त केले. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांत पाचव्यांदा घडला आहे. त्यामुळे भुयारी मार्गाला कधी मुहूर्त मिळतो, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे.

शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ या ठिकाणी गेट बंद होण्यादरम्यान पिकअप व्हॅन भरधाव निघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वयंचलित गेटला अनेकदा वाहनाचा वरचा भाग लागल्याने गेटचे नुकसान होते. काथारेने सोमवारी गेटमधून भरधाव निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान, नांदेड-मुंबई सचखंड एक्सप्रेस येत असल्याने गेट रेल्वे कर्मचारी गेट बंद करत असताना पिकअप व्हॅनने गेटला धडक दिली. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...