आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:शिवांश, अजिनाथ, अमान, संस्कृतीला सुवर्ण

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीनियस चेस अकादमी व समर्थ करिअर डेव्हलपमेंट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सिल्लोड येथील स्पर्धेत शिवांश अकाते, अजिनाथ राठोड, अमान पटेल, संस्कृती लक्कस यांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौचलवाडीचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या खेळाडूंना विकास लक्कस, माजी सैनिक प्रेमसिंग राजपूत, किशोर वराडे, आयोजक मयुरेश समिंद्रे, दिपक समिंद्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

विजेते खेळाडू बालगट - वीर बारोटे. महिला - संस्कृती लक्कस. ९ वर्ष गट - युवराज चरावंडे (प्रथम), शिवांश अकाते (द्वितीय), स्वराज बावस्कर (तृतीय), प्रथमेश बारवल (चौथा). १४ वर्ष गट - अर्णव सोनटक्के (प्रथम), आजिनाथ राठोड (द्वितीय), तनय कव्हाळे (तृतीय), पारस. खुला गट - अमान पटेल (प्रथम), निखिल (द्वितीय), निखिल चरावंडे (तृतीय), गोपाल चरावंडे (चतुर्थ).

बातम्या आणखी आहेत...