आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवबंधन:माजी महापौर सुदाम सोनवणेंनी बांधले ठाकरे गटाचे शिवबंधन

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी मुलगा संभाजी व दीडशे कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मुंबईत मातोश्रीवर हा प्रवेश झाला. आमदार प्रदीप जैस्वाल शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाचे रिक्त झालेले महानगरप्रमुखपद सोनवणे यांना मिळणार का, हे उत्सुकतेचे बनले आहे.

सोनवणे हे नारायण राणे समर्थक मानले जातात. राणेंसोबत ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. आता ते पुन्हा स्वगृही दाखल झाले आहेत. त्यांना ठाकरे गटात आणण्यात जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची महत्त्वाची भूमिका राहिली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेले विजय साळवे यांनाही महानगरप्रमुखपदाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महानगरप्रमुखपदाची माळ साळवेंच्या गळ्यात पडणार की सोनवणेंच्या हे महत्त्वाचे ठरणार आहे. सोनवणेंच्या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, आ. मनीषा कायंदे, विनोद घोसाळकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...