आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याभिषेक दिन सोहळा:औरंगाबादेतील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सकाळी 10:30 वाजता शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे, प्रशासक मुरलीधर चौधरी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, शेख मोहंमद शेख चाँद, मो.अबु सुफियान मो.गयास बागवान, गणेश कडुबा नवले, सचिव व्ही.ए.शिरसाठ आदी उपस्थित उपस्थित होते.

क्रांती चौकात जयघोष

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची दुग्ध अभिषेक करून राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. जय भवानी जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिव मावळ्यांनी हातात शिवध्वज, गळ्यात भगवा रूमाल आकर्षण ठरले.

मनपाला विसर

महापालिका प्रशासनाला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा विसर पडला. एवढेच नव्हे तर शिवजयंतीच्या दिवशी जो पुष्पहार अर्पण केले. ते हार वाळून काळे पडले आहेत. अद्याप ते काढण्याची साधी तसदी घेतली नाही. याचा मराठा क्रांती मोर्चा वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. मनपा आयुक्तांकडून हि अपेक्षा नाही. त्यांनी त्वरीत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...