आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत गदारोळ:औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांचा गोंधळ, मेटे म्हणाले - सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न कराल तर सर्व मराठा समाज शिवसेनेच्या विरोधात जाईल

औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यानंतर विनायक मेटे यांनी पत्रकार परीषद घेतली. 26 तारखेला मराठा क्रांती संघर्ष मेळावा होणार आहे. त्यासाठीच्या तयारीसाठी पाडेगावमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या लोकांनी हा कार्यक्रम उधळून लावत कार्यकर्त्यांला मारहाण केली. आमचे शहराध्यक्ष यांचा मुलगा डॉक्टर अभिमन्यू माकने याला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे. सरकारी पक्षाच्या गुंडांनी येऊन गोंधळ घातला. मात्र मराठा समाज मोगलांना आदिलशहा आणि इंग्रजानाही घाबरला नाही. त्यामुळे सरकारच्या गुंडगिरी ही घाबरणारा नाही हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा आरोप शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

मेटे म्हणाले की आम्ही आज पडेगावला मेळाव्या बाबत बैठक घेत होतो. त्यावेळी काही सरकारी पक्षाचे गुंड आले, गुंडगिरी केली, आमच्या लोकांसोबत मारामारी केली. उद्धवजी शांत स्वभावाचे आहेत. त्यांना याची माहिती देखील नसेल. मात्र अशा तडीपार गाव गुंडावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही पोलिस आयुक्तांना भेटून याबाबत तक्रार केली आहे.

मराठा समाज मोगल निजामाला घाबरला नाही
मेटे पुढे म्हणाले की आमचा मराठा समाज मोघल, निजाम, इंग्रज कुणाला घाबरलो नाही. आम्हाला घाबरवण्याची कुणाची औकात नाही. सरकार प्रश्न सोडवू शकत नाही. आंदोलन करू द्यायचे नाही आणि सभागृहात बोलू द्यायचे नाही. तडीपार गुंडांना पाठवून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा काम सरकार करीत आहे. आम्ही गप्प आहोत, याचा अर्थ आमच्या हातात बांगड्या नाहीत हे लक्षात घ्यावे.

माझी सुरक्षा सरकारने काढली
मेटे म्हणाले की बीडच्या मोर्चानंतर पोलिसांची वागणूक माझ्या सोबत बदलली आहे. माझे प्रोटेकशन सुद्धा काढून घेतले आहे. मी गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून काही घडलयास त्याला जबाबदार सरकार असेल अशा ईशारा त्यांनी दिला.

सारथीचे कार्यालय औरंगाबादला हवे
सारथीचे कार्यालय पहिल्यांदा कोल्हापूरला होणार असल्याची माहिती आहे. आमचा कोल्हापूरला विरोध नाही. पुण्याचे मुख्य कार्यालय कोल्हापूरला नेले तरी हरकत नाही. मात्र पहिल्यांदा कार्यालय औरंगाबादला व्हायला हवे. मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण येथे अनुशेष असतांना कोल्हापूरमध्ये कार्यालय सुरू झाल्यास तो अन्याय ठरेल. प्रत्येक विभागात हे कार्यालय करणे गरजेचे असून सगळे कार्यालय एकाच वेळी उदघाटन करायला हवे अशी मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...