आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची मागणी:राज्यात दोन ऐवजी एकच शिवजयंती साजरी करा, शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून दोन वेगवेगळ्या दिशवी शिवजयंती साजरी केली होती. 19 फेब्रुवारीला तारखेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा रंगतो. दोन वेळा शिवजयंती साजरी करण्याबद्दल अनेक पक्ष आणि संघटनांची मतमतांतरे आहेत. शिवसेना आतापर्यंत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम आहे. मात्र आता औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांनी दोन ऐवजी एकाच दिवशी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली आहे.

तिथीनुसार शिवजयंती साजरी न करता ती तारखेनुसारच साजरी केली जावी अशी भूमिका शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी घेतली आहे. तारखेनुसार 19 फेब्रुवारी या दिवशीच एकदाच शिवजयंती साजरी करण्यात यावी मागणी राज्य सरकारकडे करणार आहोत असे ते म्हणाले आहेत.

याविषयी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, 'दरवेळी शिवजयंती साजरी केली जात असताना काही पक्षांची आणि शिवप्रेमी संघटनांची मागणी होती की शिवजयंती एकाच दिवशी साजरी करावी. जेणेकरुन मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येतो. मात्र दोनदा साजरी केल्यामुळे त्यामध्ये अडथळे येतात. कोणताही एक दिवस हा सरकारने निश्चित करायला पाहिजे. दोन शिवजयंती या महाराष्ट्रात नको अशी आम्हा सर्वांची भूमिका आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.' असे संजय शिरसाठ म्हणाले.

तर अंबादास दानवे म्हणाले की, 'शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या ठिकाणी तिथी आणि तारखेनुसार साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी तिथीनुसार जयंती होती, आता तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंतीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. यामुळे वेगवेगळ्या तारखेला शिवजयंती साजरी का केली जाते असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी अशी मागणी सरकारकडे करणार आहोत.'

बातम्या आणखी आहेत...