आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Shivsena MLA Ramesh Bornare | Vaijapur MLA Ramesh Bornare | Marathi News | BJP Aggressive In Assault Case Against Woman; No Action Against MLA Bornare Due To Political Pressure Wagh

प्रकरण पेटले:​​​​​​​महिलेला मारहाण प्रकरणात भाजप आक्रमक; राजकीय दबावामुळेच आमदार बोरनारेंवर कारवाई नाही - वाघ

वैजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुलत भावजयीला मारहाण करणारे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे व त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी जामीनपात्र कलमाखाली कारवाई केल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात सटाणा (ता. वैजापूर) येथील कार्यक्रमाला गेल्याच्या वादातून आ. बोरनारे व इतरांनी मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात केली होती. त्यावरून दहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाख केला. भाजपने वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वाघ यांनी बुधवारी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेतली.

आ. बोरनारे यांनी पीडित महिला व तिच्या पतीला चार भिंतींच्या आत मारहाण केलेली नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी तिला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे याला कुटुंबकलह म्हणता येणार नाही. पोलिस लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली काम करीत असल्यास लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांची भूमिका संशयास्पद असल्याचेही वाघ यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्याकडे आहे. १८ फेबुवारीला प्रजापती यांच्याबरोबर पोलिस निरीक्षक राजपूत खंडाळा येथील एका गुन्ह्याच्या तपासात होते. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी वाघ यांना समजावून सांगितल्यानंतर त्या पोलिस निरीक्षकांविरोधात आक्रमक झाल्या होत्या. पोलिस निरीक्षक राजपूत यांनीही काॅल डिटेल तपासा, असे आव्हान दिले.

मोबाइल लोकेशनसह कॉल डिटेल्स तपासा : पो.नि. सम्राटसिंह राजपूत
उपविभागीय अधिकारी कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिलेला लोकप्रतिनिधीकडून मारहाण प्रकरणात पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यांच्याकडून गुन्ह्याचा तपास काढून घ्या. गुन्हा घडला त्या दिवसभरातील त्यांच्या मोबाइलवरील सर्व फोन कॉल तपासण्याची मागणी चित्रा वाघ यांनी बोलताना केली. या ठिकाणी उपस्थित पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रजापती यांच्यासमोरच वाघ यांना माझ्या मोबाइलमधील एसडीआर तपासाच, असे सुनावले.

संशयास्पद असल्याचेही वाघ यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्याकडे आहे. १८ फेबुवारीला प्रजापती यांच्याबरोबर पोलिस निरीक्षक राजपूत खंडाळा येथील एका गुन्ह्याच्या तपासात होते. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी वाघ यांना समजावून सांगितल्यानंतर त्या पोलिस निरीक्षकांविरोधात आक्रमक झाल्या होत्या. पोलिस निरीक्षक राजपूत यांनीही काॅल डिटेल तपासा, असे आव्हान दिले.

आमदार बोरनारे यांनी जिल्हा परिषदेत घेतला कामांचा आढावा
चित्रा वाघ बुधवारी वैजापूरमध्ये असताना आमदार बोरनारे मात्र, जिल्हा परिषदेत आढावा घेत होते. नियोजनातून वैजापूर तालुक्याला किती निधी मिळाला, याची माहिती त्यांनी घेतली. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या निधीत आ. बोरनारे यांनी काही कामांच्या शिफारसी केलेल्या होत्या. त्यातील किती कामे जिल्हा परिषदेने मंजूर केली, याची माहिती त्यांनी यावेळी सभापतींसह काही विभागप्रमुखांकडून घेतली. ‘मी केलेल्या शिफारशीनुसार माझ्या मतदारसंघाला निधी मिळाला, त्यावर मी समाधानी आहे’, असे यावेळी बाेरनारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पीडित महिलेशी संपर्क होत नाही

  • मारहाण प्रकरणातील महिलेचा जबाब घेण्यासाठी मोबाइलद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे तपास अधिकारी कैलास प्रजापती यांनी सांगितले.
  • भाजपच्या चित्रा वाघ यांचे पोलिस निरीक्षकावर आरोप
  • भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेतली.
  • विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्याची पोलिसांकडे केली मागणी
बातम्या आणखी आहेत...