आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अडीच कोटी खर्चातून क्रांती चौक उड्डाणपुलाखाली उभी राहणार शिवसृष्टी, स्मार्ट सिटीतून केला जाणार खर्च

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांती चौक उड्डाणपुलाखाली स्मार्ट सिटीतून शिवसृष्टी उभी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश असेल. या कामासाठी स्मार्ट सिटीतून २ कोटी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

क्रांती चौक उड्डाणपुलाखाली सध्या शिवसृष्टीचे काम सुरू झाले आहे. क्रांती चौक हा शहराचा मध्यवर्ती भाग येतो. याच चौकात शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन व्हावे, या उद्देशाने ही शिवसृष्टी निर्माण केली जात आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनामधील महत्त्वाचे क्षण, घटना या डिजिटल चित्र, रिप्लिका आणि म्यूरल्सच्या माध्यमातून उभे करण्याचा प्रयत्न असेल. तसेच महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीही यात असतील.

चौकामध्ये मधोमध महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि दोन्ही बाजूंनी पुलाखाली शिवसृष्टी तयार केल्यानंतर या परिसराचे सौंदर्य खुलून दिसेल. शिवसृष्टी पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येतील, असे नियोजन आहे. या कामासाठी दोन कोटी ६० लाख रुपयांचा खर्च येणार असून हा निधी स्मार्ट सिटी योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...