आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील धक्कादायक घटना:अग्नीवीर भरती प्रक्रियेत रनिंग करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 6 महिन्यांपूर्वीच आईला गमावले

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्नीवीर भरती प्रक्रिये दरम्यान रनिंग करताना 20 वर्षीय तरुणाचा कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रनिंग करताना तरुणाला चक्कर आली. त्यानंतर तो धावपट्टीवरच तरूण खाली कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. हा तरुण कन्नड तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. तसेच 6 महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद येथील विद्यापीठात असलेल्या मैदानावर सध्या अग्नीवीर सैन्य भरती सुरु आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाची भरतीदरम्यान रनिंग सुरु होती. हा तरुण कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील रहिवासी आहे. 1600 मीटर रनिंग करताना या तरुणाला चक्कर आली. करण पवार असे या तरुणाचे नाव आहे. त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आर्थिक परिस्थिती जेमतेम

करणची कौटुंबिक अर्थिक परिस्थिती जेमतेम असून सैन्यात जाऊन घरची परिस्थिती बदलण्याचे त्याचे स्वप्न होते. आई सतत आजारी राहत असल्याने स्वतः स्वयंपाक करून तो आई आणि भावाला जेवू घालत असे. दरम्यान सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचेही निधन झाले होते. सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी तो 6 वर्षांपासून सराव करत होता.

यशाआधीच मृत्यूने गाठले

करणच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक कन्नडहून औरंगाबादमध्ये आले. सैन्यात भरती होण्याची करणची तीव्र इच्छा होती. त्यासाठी गेले अनेक दिवस तो कसून सराव करत होता. मात्र यश मिळण्याआधीच त्याला प्राण गमवावे लागले. शहरात तयारी करण्यासाठी आलेल्या युवकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...