आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:राखीव दलाच्या जवानाकडून गोळीबार, तातडीने चौकशीचे आदेश, इतर जवानांचे जवाब नोंदविले जाणार

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

येथील राज्य राखीव दलामध्ये गार्ड ड्यूटीवर असलेल्या जवानाकडून अनावधानाने गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी ता. ३० दुपारी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून राखीव दलाचे अधिकारी चौकशी करीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

येथील राज्य राखीव दलामध्य कार्यरत असलेेले जवान अमोल वाबळे हे आज सकाळपासून क्वाटर गार्ड ड्युटीवर कार्यरत होते. या ठिकाणी राखीव दलाची सर्व हत्यारे व इतर शस्त्रसाठा असतो. आज दुपारी अचानक त्यांच्याकडे असलेल्या एसएलआर बंदुकीतून एक गोळी उडाली. सदर गोळी भिंतीला लागून तेथेच पडली. या घटनेनंतर राखीव दलात एकच धावपळ सुरु झाली. तर हिंगोली शहरात या गोळीबाराच्या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या घटनेमध्ये जवान अमोल हे किरकोळ जखमी झाल्याचेही सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात त्यांच्या सोबत कर्तव्यावर असलेल्या इतर जवानांचे जवाब नोंदविले जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्यामुळे गोळीबाराचे नेमके प्रकरण काय आहे हे चौकशी अंतीच स्पष्ट होणार आहे.

या संदर्भात राखीव दलाचे प्रभारी समादेशक रवींद्र जाधव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र जवानाकडून अनावधानाने गोळी उडाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले असून तातडीने चौकशी सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कुठल्याही प्रकारचा घातपात नाही शिवाय कोणीही जखमी नसल्याचेही जाधव यांनी सांगितले.