आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायदंडाधिका-्यांचा आदेश:दुकानदाराला बेदम मारहाण, 6 आरोपींना पोलिस कोठडीट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याच्या कडेला झोपडीवजा दुकान थाटून स्वेटर, ब्लँकेट्स विकणाऱ्या दुकानातून ब्लँकेट्स उचलून नेताना रोखल्याने टोळक्याने गोळीबार करून दुकानदाराला बेदम मारहाण केली होती. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली. या सर्वांना १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. गुणारी यांनी दिले.

संतोष ऊर्फ राजू झाल्टे (३८, रा. वडगाव कोल्हाटी), प्रथमेश संजू कांबळे (२३, वडगाव कोल्हाटी), प्रशांत बनसोडे (२९, रा. रांजणगाव शेणपुंजी), अशोक दाभाडे (२८, रा. समतानगर ता. गंगापूर), किशोर खरात (२८, परदरी) आणि सय्यश शोएब अली ऊर्फ गुड्डू मुमताज अली (३१, रा. राहुलनगर, रेल्वे स्टेशन) अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात जखमी मुकेश नथुलाल बंजारा (२६, मूळ रा. मध्य प्रदेश, ह.मु. ओयासीस चौक, एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली. १३ डिसेंबरला रात्री ११ वाजता मारहाणीची ही घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...